Visapur killa
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAvc-a2BRNpI8iY5WcNYiVKJFOe5mj7Gs93leV_BBTDQkZyRNJFE6-sw_Bg0QZb-ONWoEW7nw8ASWdZntpWCAqrL07dRhHY19RrrRz85e_bXIdDz6rltVRLyxmgNMjMVFMRi5bOMP1Kx3u/s320/Screenshot_20180728-074915.png)
विसापूर किल्ला किल्ल्याची उंची: 3556 फूट (1084 मीटर) श्रेणी - मध्यम गडावर जाण्याचा मार्ग- पुण्यापासून सुमारे 80 km. पुणे-मुंबई महामार्ग-तळेगाव-कार्ले गाव-मळवली गाव-भाजे लेणी-विसापुर किल्ला जवळचे रेल्वे स्टेशन -मळवली रेल्वे स्टेशनवर उतरून भाजे लेणी मार्गे विसापुर किल्ला. विसापूर किल्ल्याचा इतिहास: विसापूर किल्ला 18 व्या शतकाात पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. किल्ल्यावरील हनुमान मंदिराचे बरेच भाग आहेत आणि ते विसापूर किल्ल्याचे संरक्षक देवस्थान आहे असे सूचित करतात. ४ मार्च इ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी लोहगड काबीज केला विसापूर किल्ला लोहगड किल्लाचा दुहेरी किल्ला आहे लोहगड पेक्षा या किल्ल्या ची उंची जास्त आहे किल्ल्याला उत्कृष्ट तटबंदी व नैसर्गिक संरक्षण देण्यात आले आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि साठवण टाक्या आहेत ज्यामुळे ते लां...