Visapur killa

   विसापूर किल्ला

किल्ल्याची उंची: 3556 फूट (1084 मीटर)
श्रेणी - मध्यम

गडावर जाण्याचा मार्ग-
पुण्यापासून सुमारे 80 km. 
पुणे-मुंबई महामार्ग-तळेगाव-कार्ले गाव-मळवली गाव-भाजे लेणी-विसापुर किल्ला

जवळचे रेल्वे स्टेशन -मळवली रेल्वे स्टेशनवर उतरून भाजे लेणी मार्गे विसापुर किल्ला.

  विसापूर किल्ल्याचा इतिहास:
  1. विसापूर किल्ला 18 व्या शतकाात पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता.
  2. किल्ल्यावरील हनुमान मंदिराचे बरेच भाग आहेत आणि ते विसापूर किल्ल्याचे संरक्षक देवस्थान आहे असे सूचित करतात.
  3. ४ मार्च इ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी लोहगड काबीज केला

      विसापूर किल्ला लोहगड किल्लाचा दुहेरी किल्ला आहे लोहगड पेक्षा या किल्ल्या ची उंची जास्त आहे किल्ल्याला उत्कृष्ट तटबंदी व नैसर्गिक संरक्षण देण्यात आले आहे.किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि साठवण टाक्या आहेत ज्यामुळे ते लांब युद्धांत टिकून राहण्यास मदत करतात.
आठवणीतले क्षण 
  मे महिन्यात भरपूर कालावधी नंतर आम्ही वर्ग मित्र एकत्र जमलो या वेळेस कारण होते,आमचा वर्ग मित्र निलेश राऊत याला कन्या रत्न प्राप्त झाल्यामुळे.बाळ दिसायला परी सारखे छानच होते.
  तीर्थाला (बाळ) बघून आणि निलेशचे अभिनंदन करून आम्ही हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये चहा घेत एकमेकच्या हाल हवा जाणत आणि नव्या जुन्या गोष्टींची चर्चा करता करता मित्रांनी ट्रेक ला जायचे म्हणून विषय काढला मग काय ट्रेक म्हणल्यावर विषयाला सुट्टीच नसते, सर्व जणांना वन डे ट्रेक करायचा होता म्हणून जून मधी विसापुर किल्ला करायचे ठरवले,पण कामाची गडबड असल्या मुळे जून मध्ये शक्य झाले नाही,जुलै उजाडला आता पाऊस बऱ्या पैकी झाल्या मुळे आता हा ट्रेक अजून पुढे ढकलुन चालणार न्हवते.
  आठवडा भर आधी सर्वाना फोन करून ट्रेक ची तारीख ठरवली.या ट्रेक ला सुरज,केतन,पंकज,सुमित,सागर आणि मी आम्ही 6 जण तयारीत होतो,15 जुलै 18 ला सकाळी 6.30 वाजता जायचे ठरले,
 ठरल्या प्रमाणे जायचा दिवस उजाडला आणि ठरल्या प्रमाणे मला उशीरच झाला , पण या वेळेस सर्वात पहिला पंक्या हाजीर होता जो दर वेळेस उशीर यायचा.आता या वेळेस पण बोलणी ऐकून घेयची माझीच वेळ होती 6.30 चे 7.00 झाले.
सकाळची वेळ असल्यामुळे चहा घेतला आणि प्रवासाला सुरवात केली , पुणे ते विसापुर किल्ला अंतर 80 km असल्यामुळं लवकर आम्ही पोहाचू असा अंदाज होता.रस्त्यात सर्वाना भूक लागल्याने नाष्टा करण्यासाठी हायवेला हॉटेल मध्ये मिसळ पाव चा जोरदार नाष्टा झाला
पोट पूजा करून पुढच्या प्रवासाला सुरवात केली आता थेट विसापुर किल्ल्याचा पायथा गाठायचं ठरवलं , रस्त्यात भरपूर पाऊस सोबतीला होता .आज त्याचीआमच्या सोबतची साथ सुटणार न्हवती हे माहित होते,सुट्टीचा वार असल्यामुळे गर्दी चांगलीच होती,

                                धबधब्यांमुळे मळवली गावापासून जोरदार गर्दी ला सुरवात झाली.
सकाळचे 10 वाजले होते आम्ही विसापुर किल्ल्याच्या पायथ्याशी होतो,पावसाची रिमझीम चालू होती त्यामध्ये आमची ट्रेक ला सुरवात झाली
      किल्ल्यालगत एक टेकडी होती आम्हा सर्वाना वाटले हाच किल्ल्यावर जायचा रस्ता असावा म्हणून आम्ही सुरवात केली तर खरी पण पावसा मुळे माती गुळगळीत झाल्यामुळे रस्ता निसरडा झाला होता,आमचे दोन कार्यकर्ते सोडले तर बाकी चौघांना साधे पाय पुढे टाकता येईना,जस पुढे एक पाऊल टाकले की 8 ते 10 फूट घसर घुंडी होत होती,सोबत मागे असलेल्या सगळ्यांना घेऊन घसरून जायचो बराच प्रयत्न केला पण वर काय जाईन म्हनून दुसऱ्या मार्गानी जायचा निर्णय घेतला,
    पण पंकज आणि केतन ऐकणाऱ्यातली माणसे न्हवती,ती दोघे पुढे गेली,मला अजून समजले नाही काही जणांना घान सवय असते पुढं पुढं जायची ठीके जावा पुढं पण पुढं जाऊन करणार तरी काय शेवटी सगळे येई पर्यंत थांबणारच ना,मग सगळ्या सोबत जायला हरकत काय?
              पंकज शेठ
                    केतन शेठ
        हेच ते दोघे पुढे जाणारी,पण या वेळेस पुढे जाऊन याना काही फायदा झाला नाही,उलट दगा झाला कारण ही वाटच चुकीची होती.आम्ही चौघांनी एकीने निर्णय घेतलेला बरोबर होता,शाळेमध्ये ऐकीचे बळ धडा होता तो शिकवण्याच्या तासाला हे दोघे गैर हजर असतील म्हणून आज अस झालं यांचं आता तरी सुधारा रे पंकज आणि केतन.
       
        डावी कडे विसापुर किल्लाची कातळ ठेऊन वाट सरळ होती,किल्ल्याच्या कातळ भिंती चिरून धबधब्यांनी जन्म घेतला होता,हे दृश्य जेवढे बघू तेवढे कमीच होते जेवढ मनात झोळीत भरता येईल तेवढे मनमोहक निसर्ग मनात साठून घेत होतो.
       अचानक लक्षात आले कि आपले दोन हिरे तर माघेच आहेत मग पुढे थांबून त्यांची आम्ही वाट बघू लागलो तोवर आमचे फोटो सेशन सुरु झाले

       पाणी बिस्कीट खातानी चौघे मित्र

           डावीकडून सुमित,सुरज,आशिष आणि सागर

   अर्धा तासानी आमचे दोन हिरे आम्हाला परत मिळाले,त्यांचा आनंद बघण्या सारखा होता आता सगळ्यांना सोबत घेऊन पुढच्या प्रवासास सुरवात केली


                            पुढची वाट हि कडक आणि आयुष्यात न विसरणार होती ,बघून समजेलच.
 गडावर पोहचण्याचा मार्ग


                                                         धबधब्यातुन वाट काढत आम्ही मित्र
           डोंगराच्या कुशीतून पिण्याचे पाणी भरून घेतले
         दीड ते दोन तासात आम्ही गडावर पोहाचलो गडावर वारा आणि पाऊस मजबूत होता.
 
नयन रम्य धबधबा


जोरदार वाऱ्या मूळे पाऊस आणि धबधब्यांचा उलटा मारा मनसोक्त घेताना.

 गडावरती डबक्यातील पाण्यात डुबण्याचा आनंद निराळाच तो शहरातील स्विमिंग टॅन्क मध्ये पैसे देऊन पण मिळणार नाही.
भाजे लेणी मार्गे आल्यास या मार्गावरून आपण किल्ल्यात प्रवेश करतो



सुमारे 300 वर्षा पूर्वी बांधलेला हा किल्ला अजूनही याच्या पायऱ्या भक्कम स्थितीत आहेत आणि पावसाळ्यात या पायऱ्यांवरून पाणी ओसांडुन वाहणारे नजारा भारी आहे.
                                                                      भक्कम तटबंदी

                                      पाण्याचे टाके आणि कातळी वरील बजरंगाचे रेखीव शिल्प.

    पाऊस आणि ढग जास्त असल्यामुळे आम्ही किल्ल्यावरील वास्तू, ठिकाणे आणि गडावरील अजून निसर्ग सौंदर्य बगण्यात आम्ही असमर्थ होतो,जेवढं पाहून घेता येईल तेवढे आयुष्याच्या डायरीत नोंदवून परतीच्या मार्गाला लागलो.
       सर्वांनी गाड्या काढल्या हायवे ला पंजाबी ढाबा मध्ये जेवणासाठी थांबलो उत्तम जेवण करून आम्ही सायंकाळी 7 वाजे पर्यंत पुण्यात पोहचलो,आमची सफर उत्तम झाली,उद्या पासून परत रोजच्या धावपळी च्या जीवनाला सुरवात होणार होती त्यामुळे सर्वांनी एकमेकाचा निरोप घेतला,निरोप घेतानी मला असे जाणवले कि सकाळी आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा जो उत्साह होता तो निरोप घेतानी न्हवता जाणवत ,पाऊले जड झालती, तरी हसत खेळत निरोप घेतला.  ट्रेक च्या आठवणी सोबत तर आहेच कधी पाहिजे तेव्हा आयुष्यातील मागचं पान काढून निसर्ग आठवून मन पुन्हा ताजे करता येईलच असे मानून आपला सर्वांचा निरोप घेतो.
         
             वेळ काढून वाचल्या बद्दल धन्यवाद .

Comments

Post a Comment